*नवी दिल्ली येथे बुद्धिजीवी संघटनेचे संमेलन – महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे..*👇
*नवी दिल्ली (प्रतिनिधी) दिनांक १२ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ इंटेलेक्चुअल अर्थात बुद्धिजीवी संघटना ह्या जागतिक संस्थेच्या वतीने नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटर मॅक्समुलर रोड येथे राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे राष्ट्रीय सेक्रेटरी महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी दिली..*
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल के.एम.सेठ पूर्व राज्यपाल छत्तीसगड हे भूषवणार आहेत..*
*ह्या कार्यक्रमात भारतातील अनेक राज्यातील नामवंत समाजसेवकांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे..*
*ह्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती जस्टिस राजेश टंडन, खासदार डॉ.सरमीत पात्रा, हिमालया ग्रुपचे डॉ. एस फारुख, सीबीआयचे प्रमुख डॉ.जी आर कार्तिकेयन, माजी खासदार अनिल अग्रवाल, माजी राज्यपाल आसाम जगदीश मिखी, एअर मार्शल राजेश भंडारी, प्रेम सिंग डिंगरा, नलीन प्रभात, विनोद शर्मा, श्रीमती अनुश्री ख्वाजा मोहम्मद शफी, निजामी (नजीम उद्दीन दर्गा वंशज) लाभणार आहे..*
*कार्यक्रमास देशातील सर्व संस्थेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सर्वेसर्वा ऍडव्होकेट प्रकाश निधी शर्मा यांनी केले आहे..!*



